Tuesday 15 April 2014

माझी रोजनिशी

माझी रोजनिशी
रोजनिशी बद्दलच्या माझ्या खूप मजेशीर आठवणी आहेत.
रोजनिशी लिहण्याचा छंद मला तेव्हा पासून लागला जेव्हा मी ९ इयत्तेत होतो. आम्हाला इंग्रजीमध्ये '' अ डायरी ऑफ अन फ्रंक '' नावाचा एंक धडा होता. जर्मनी मधे हिटलर च्या भीतीने एंक कुटुंब (अनेक ज्यू  कुटुंबा  प्रमाणे) भूमिगत जीवन जगत असत.  त्यातील फ्रांक नावची मुलगी रोज तिची रोजनिशी लिहत असते. त्यात तिचे दिवसभराचा तपशील तिने नोदवलेला आहे . अशी हि फ्रंक  जी डायरी आपल्या सर्वच्या परिचयाची आहे. त्याबद्दल वाचल्यापासून मला पण रोजनिशी लिहावी  वाटू लागलं. आणि मी लिहिला लागलो,  पण लिहायचं काय हा प्रश्न पडला, त्यात काही दिवस गेले. मग ठरलं जे शाळेत, मित्रात अनुभवतो ते लिहायचं. तोडक्या मोडक्या वाक्यात लिहिला सुरवात झाली, पण काही काळानंतर रोजनिशी कोनाड्यात.


                                                           

जेव्हा कॉलेजला आलो, पुस्तक  प्रदर्शनात '' अ डायरी ऑफ अन फ्रंक '' हे पुस्तक बघितलं आणि पुन्हा रोजनिशी लिहायाल सुरवात झाली. कॉलेज च्या गमती जमती, मितासोबत च्या गप्पा, स्राचे किस्से, वाचण्यात अल्लेल्या नवीन गोष्टी. या सर्व गोष्टी मग रोजनिशीत येऊ लागल्या. आता खरी लिहायला सुरवात झाली. पण परीक्षेच्या  काळात हि सवय पण बंद झाली. पण लिहलेलं  वाचायला खूप मज यायची, याच  काळात बाकी सिजनल कवी प्रमाणे, मी कविता पण लिहिला लागलो, अंनि महिनाभरात बंद पण केलं

आत्ता जॉब लागल्या पासून मात्र लिहण्याचा सिरीयसली विचार करत होतो, प्रत्यक नवीन वर्षाला संकल्प करून सुरवात पण होतेय आणि मधेच लिंक ब्रेक. . . .
खूप दिवसापासून ब्लोग वाचतोय, मग ठरवलं आत्ता ब्लोग लिहायचा, खूप विचार केल्यानंतर ठरवलं रोजनिशीच्या आठवणी पासून सुरवात करायची, आत्ता सुरवात झाली.

 पण हि आठदिनी असेल. पण याची  प्रेरणा आहे. ती फ्रंक ची डायरी. आणि म्हणून हि माझी रोजनिशी .



लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.

 लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.     तणाव आणि चिंता मानवी जीवन ऊर्जा शोषून घेतात. अनेक आजाराच्या मुळाशी, आणि प्रगतीला रोखण्यास क...