Saturday, 26 August 2023

सकारात्मक विचाराचे सामर्थ्य.....

सकारात्मक  विचाराचे सामर्थ्य, पुस्तकाविषयी 

विचार हे आपल्या आयुष्याला सर्वार्थने बदलत असतात किंवा, आकार देत असताता. आपण मात्र त्या कडे एवढ्या काळजीपूर्वक लक्ष्य  देत नसतो. परिणामी खूप साऱ्या उलथापालथ किंवा गोंधळ आपल्या आयुष्यात घडत जातो. एखादी गोष्ट आपण मिळवण्यासाठी जेवढी म्हणून धडपड किंवा कष्ट आपण घेतो त्याच्या १ किंवा २ टक्के मेहनत जर  आपण आपल्या विचारांवर काम केलं तर आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी, सुरळीत आणि आपल्या मनाजोगत्या होतील यात शंका नाही. 
                   या बद्दलचे बरेच विचार आपण वेळोवेळी ऐकत असतो. पण याची सुरवात कशी करायची, विचारला कशी दिशा द्यायची, जाणीवपूर्वक आपल्या कामासाठी कसा वापर करायचा.  हे आपल्याला कळत नसते.  
      
चला तर मग आज सुरवात करूया एका  अशा पुस्तकांपासून ज्यांनी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवले आहेत, आणि ते पण आपल्या छोट्या छोट्या कृतीतून, आणि कुठलीही आगाऊ मेहनत किंवा कुठलीही फीस न देता, सरळ आणि सोप्या technique मधून. 
पुस्तकात काय आहे. 

हे पुस्तक सर्वस्वी आपली विचाराच्या सामर्थ्याविषयी भाष्य करते,  विचारात किती ताकत आहे,  तो विचार तुम्ही कशा प्रकारे करता. त्यावर त्याची शक्ती आणि विधवंसकता ठरते, हे या पुस्तकात उदाहरण सहित सांगितले आहे. 

सकारत्मक विचार तुम्हाला किती फायदा मिळून देऊ शकतात आणि ते सुविचार आपण कशाप्रकारे अमलात अनु शकतो हे यात मांडलेले आहे. 

१.  आपले धेय्य कशे ठरवावे, आणि ते कशाप्रकारे साध्य करावे . 
२.  आपण हाती घेतलेल्या गोष्टीवर ( संकल्पावर. कामावर  ) कशा प्रकारे विश्वास ठेवावा. आणि ते पूर्ण करावे. 
३. आपले ध्यये गाठण्यासाठी ऊर्जा कशाप्रकारे निर्माण करावी. 
४. चिंता करण्याची सवय आणि जीवनातील ताणतणावांवर कसे नियंत्रण मिळवावे. 
५. कठीण परिस्थितीला  काबू कसे करावे. 
६. वैयक्तिक संबंध कशे सांभाळावे 


  वरील गोष्टी आपण या पुस्तकातून शिकू शकतो, आणि हजारो लोकांनी ज्या प्रकारे आपल्या  जीवनात परिवर्तन उघडून आणले आहे. आपण पण आपली आयुष्यात निश्चित एक आशावादी परिवर्तन घडू शकतो. 


पुस्तक कसे वाचावे. 

पुस्तके वाचायची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. त्यामुळे प्रतकानी आपल्या ला जमेल अशाप्रकारेच पुस्तक वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचताना एक छोटी डायरी आपण सोबत ठेवली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. 
या मध्ये छोटी छोटी अवतरणे आणि सुविचार आपण लिहून घेऊ शकतो. सोबतच प्रत्येक चॅप्टर मध्ये लेखकांनी  काही Techniques दिल्या आहेत ज्या आपल्याला अमलात आणायच्या आहेत. त्या आपण आपल्या डायरीत लिहू घेऊ शकतो. 
दररोज  त्याचा वापर करू शकतो.
Sunday, 3 November 2019

ट्रेन टू पाकिस्तानप्रसिद्ध  लेखक आणि पत्रकार जसवंत सिंग यांचे  ट्रेन टू  पाकिस्तान ह्या इंग्लिश पुस्तकाचे मराठी भाषांतर  काल वाचून संपवलं.  हि  छोटेखानी कादंबरी भारत - पाकिस्तान फाळणीच्या वेळी सीमेलगतच्या छोट्याश्या गावात  घडते.

मनोमानजरा  नावाचं सतलज नदीकाठी वसलेलं शिख- मुस्लिम लोक वस्ती असलेलं  एक छोटासा गाव,गावाच्या  लागत रेल्वे जंकशन आहे, सीमेलगतच शेवटचं  गाव आणि त्यामुळेच या गावाला थोडस महत्व आहे. 

गावात एकुलतं एक हिंदू सावकाराच  घर आहे. त्या सावकाराच्या घरी दरोडा पडतो आणि त्याचा खून होतो. गावातील एका दरोडेखोरांचा आणि एका मुस्लिम मुलीचं  एकमेकांवर प्रेम आहे,
देशाची फाळणी  झाली आहे, पाकिस्तान हा मुस्लिमांसाठी वेगळा देश अस्तित्वात आला आहे.

 एका दिवशी  सतलज नदीपलीकडील पाकिस्तानातून एक ट्रेन येते माणसांनी  खचाखच भरलेली; पण हि ट्रेन रोजच्या सारखी नाही. शांत असलेलं मनोमानजरा ढवळून निघत. 

Tuesday, 15 April 2014

माझी रोजनिशी

माझी रोजनिशी
रोजनिशी बद्दलच्या माझ्या खूप मजेशीर आठवणी आहेत.
रोजनिशी लिहण्याचा छंद मला तेव्हा पासून लागला जेव्हा मी ९ इयत्तेत होतो. आम्हाला इंग्रजीमध्ये '' अ डायरी ऑफ अन फ्रंक '' नावाचा एंक धडा होता. जर्मनी मधे हिटलर च्या भीतीने एंक कुटुंब (अनेक ज्यू  कुटुंबा  प्रमाणे) भूमिगत जीवन जगत असत.  त्यातील फ्रांक नावची मुलगी रोज तिची रोजनिशी लिहत असते. त्यात तिचे दिवसभराचा तपशील तिने नोदवलेला आहे . अशी हि फ्रंक  जी डायरी आपल्या सर्वच्या परिचयाची आहे. त्याबद्दल वाचल्यापासून मला पण रोजनिशी लिहावी  वाटू लागलं. आणि मी लिहिला लागलो,  पण लिहायचं काय हा प्रश्न पडला, त्यात काही दिवस गेले. मग ठरलं जे शाळेत, मित्रात अनुभवतो ते लिहायचं. तोडक्या मोडक्या वाक्यात लिहिला सुरवात झाली, पण काही काळानंतर रोजनिशी कोनाड्यात.


                                                           

जेव्हा कॉलेजला आलो, पुस्तक  प्रदर्शनात '' अ डायरी ऑफ अन फ्रंक '' हे पुस्तक बघितलं आणि पुन्हा रोजनिशी लिहायाल सुरवात झाली. कॉलेज च्या गमती जमती, मितासोबत च्या गप्पा, स्राचे किस्से, वाचण्यात अल्लेल्या नवीन गोष्टी. या सर्व गोष्टी मग रोजनिशीत येऊ लागल्या. आता खरी लिहायला सुरवात झाली. पण परीक्षेच्या  काळात हि सवय पण बंद झाली. पण लिहलेलं  वाचायला खूप मज यायची, याच  काळात बाकी सिजनल कवी प्रमाणे, मी कविता पण लिहिला लागलो, अंनि महिनाभरात बंद पण केलं

आत्ता जॉब लागल्या पासून मात्र लिहण्याचा सिरीयसली विचार करत होतो, प्रत्यक नवीन वर्षाला संकल्प करून सुरवात पण होतेय आणि मधेच लिंक ब्रेक. . . .
खूप दिवसापासून ब्लोग वाचतोय, मग ठरवलं आत्ता ब्लोग लिहायचा, खूप विचार केल्यानंतर ठरवलं रोजनिशीच्या आठवणी पासून सुरवात करायची, आत्ता सुरवात झाली.

 पण हि आठदिनी असेल. पण याची  प्रेरणा आहे. ती फ्रंक ची डायरी. आणि म्हणून हि माझी रोजनिशी .Sunday, 15 December 2013

आरंभ

नमस्कार,
 आनंदतरंग  ब्लॉग सादर करताना मला खूप आनंद होतो आहे.
 खूप दिवसापासून लिहिण्याची इच्छा होती. आज सुरवात झाली.
 तुकोबाच  ''आनंदाची डोही आनंद तरंग''  हा  अभंग मला खूप आवडतो, जीवनातील प्रत्येक गोष्टीचा 
 भरभरून आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, आणि त्या लयीत सतत तल्लीन असावं. म्हणून " आनंदतरंग "
   ह्या ब्लॉग मध्ये मी माझ्यापरीन जमेल तसं लिहण्याच प्रयत्न करणार आहे. आठवणी, अनुभव, नविन  कल्पना, शोध आणि पुस्तकाचा आपल्यापरीन विचार करणार आहे. एका वेगळ्या दृष्टीकोनातून.    

धन्यवाद 

सकारात्मक विचाराचे सामर्थ्य.....

सकारात्मक  विचाराचे सामर्थ्य, पुस्तकाविषयी  विचार हे आपल्या आयुष्याला सर्वार्थने बदलत असतात किंवा, आकार देत असताता. आपण मात्र त्या कडे एवढ्य...