Sunday 10 December 2023

लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.

 लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या. 


 तणाव आणि चिंता मानवी जीवन ऊर्जा शोषून घेतात. अनेक आजाराच्या मुळाशी, आणि प्रगतीला रोखण्यास कारक जे घटक असतात त्यात चिंता आणि तणावाचे खूप मोठा वाट असतो. 

तणाव आणि चिंता हे जीवनातील एक अपरिहार्य आहेत काही वेळेस त्या टाळता जरी येत नसल्या तरी.  त्याचे योग्य नियोजन करून आपण त्यावर मात  करू शकतो. 

बऱ्याच वेळेस आपण काल्पनिक समस्सेचा बाऊ करून चिंता करतो किंवा. अतिविचार च्या संमसेने त्रस्त असतो. या सर्व गोष्टीचा आपण कशा प्रकारे मुकाबला करू शकतो हे आपण लाओ त्सू  तत्वेत्यांच्या काही विचाराच्या मदतीने जाणून घेऊयात. 

 

तणाव व चिंतेचे  कारण. 

१. एखाद्य गोष्टीची मिळण्याची इच्छा किंवा अपेक्षा. 

२. खूप सारी  नियोजन 

३. भूतकाळातील ओझे वाहने 

४. भविष्याची स्वप्ने आणि अति विचार 



लाओ त्सु . 

इसा पूर्व ५०० शतकातील, चीनमधील लाओ त्सु हे  मोठे तत्त्ववेत्ते होते. ताओझीम या बुद्धिस्ट फिलोसोफया चे निर्माते मानले जातात.  बुद्धिस्ट फिललॉसॉफी मध्ये ताओझीम ला खूप महत्वाचे स्थान  आहे. तणाव पासून मुक्ती साठी चे काही नियम आत्मसात करू आपण नक्कीच आपल्या जीवनात त्याचा फायदा करून  घेऊ शकतो. 



१. वर्तमानात जगा.

 भूतकाळातील ओझी वाहण्यातच किंवा भविष्याची स्वप्ने पाहण्यात आपली अति मौल्यवान वेळ जाते. आपण आजचे आणि आत्ताचे जीवन जगणे विसरून जातो.   

आत्ता सुरु असलेल्या कामात जर  मन लावून काम करण्याचा प्रयत्न  केला तर कामाची गती किंवा flow प्राप्त होऊन आपण रममाण होतो, आणि आनंदाचे अनुभवू शकतो या वेळी चिंता आणि तणावाच्या कितीतरी दूर आपण असतो. आणि या आपल्या कार्य संपल्यानंतर हि कित्येक तास आपण  अनुभवातून जात असतो तणावापासून दूर राहतो. 

 वर्तमानात जगण्याची कला समजून घ्या, वर्तमानात जगा. आणि तणावापासून दूर रहा. 


 २. साधी राहणी. ( Simple Life Style ) 

life style आपल्या सामाजिक स्तर उंचावण्यासाठी, नवीन संधी  उपलब्ध होण्यासाठी जरी महत्वाचा असल्या तरी त्या तुलनेत आपण ती  सांभाळण्यात आपला बराच वेळ, आणि विचार खर्ची पडतो,  पर्यायी आपण सतत आपली राहणी सुधारण्यात निटनिटके राहण्यात व्यस्त होतो. 

आपल्या कामात आणि आनंदात राहण्याच्या ऐवजी आपण स्वतःची ( Life  style )तुलना दुसर्याशी करण्यात घालवतो आणि सतत तणावात राहतो. 

या उलट जर आपण successful आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांची राहणी पहिली तर,  ते लोक खूप साधे आणि शांत राहणं पसंत करतात. 

३. सोडून द्या.

आयुष्यातील बराच तणाव हा एखाद्या घटनेला चिटकून राहिल्यामुळे निर्माण होतो.  बरीच गोष्टी आपण सोडून द्यायला शिकल्या पाहिजेत. 

लाओ त्सु  म्हणतो चांगल्या किंवा  वाईट घटना निसर्ग चक्राचा  भाग असताता, त्या बदलत असतात,  आपल्याला  नकोश्या असलेल्या घटना  पण बदलून चांगल्या घटना चे चक्र येते. त्यामुळे वाईट गोष्टी बद्दल जास्त विचार न करता त्या सोडून दयायला शिकले पाहिजे.  

४. प्रवाहा सोबत वहा 

जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहा सोबत चला. जीवनामध्ये  गोष्टी आपणं बदलू शकत किंवा त्या टाळू शकत नाही . त्या मुळे  त्या सोबत बदलण्याचा, त्या परस्थिती सोबत राहण्याची सवय  लावून घ्या. 

   महापुरे  झाडे जाती, तेथे लव्हाळी राहती - संत तुकाराम  

विरोध  करू  नका. स्वीकार करा.  समोर येणाऱ्या परिस्थितीला आपण जेवढा विरोध करू, तेवढीच ती गोष्ट जास्त ताकतीने आपल्याकडे येईल, त्या फोर्स ला आपण बदलू शकत नाही, त्यामुळे त्या सोबत चालण्याचा प्रयत्न करा. व मानसिक स्तरावरती त्या परस्थीचा स्वीकार करा.....  

 



No comments:

Post a Comment

लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.

 लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.     तणाव आणि चिंता मानवी जीवन ऊर्जा शोषून घेतात. अनेक आजाराच्या मुळाशी, आणि प्रगतीला रोखण्यास क...