Saturday 26 August 2023

सकारात्मक विचाराचे सामर्थ्य.....

सकारात्मक  विचाराचे सामर्थ्य, पुस्तकाविषयी 

विचार हे आपल्या आयुष्याला सर्वार्थने बदलत असतात किंवा, आकार देत असताता. आपण मात्र त्या कडे एवढ्या काळजीपूर्वक लक्ष्य  देत नसतो. परिणामी खूप साऱ्या उलथापालथ किंवा गोंधळ आपल्या आयुष्यात घडत जातो. एखादी गोष्ट आपण मिळवण्यासाठी जेवढी म्हणून धडपड किंवा कष्ट आपण घेतो त्याच्या १ किंवा २ टक्के मेहनत जर  आपण आपल्या विचारांवर काम केलं तर आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी, सुरळीत आणि आपल्या मनाजोगत्या होतील यात शंका नाही. 
                   या बद्दलचे बरेच विचार आपण वेळोवेळी ऐकत असतो. पण याची सुरवात कशी करायची, विचारला कशी दिशा द्यायची, जाणीवपूर्वक आपल्या कामासाठी कसा वापर करायचा.  हे आपल्याला कळत नसते.  
      
चला तर मग आज सुरवात करूया एका  अशा पुस्तकांपासून ज्यांनी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवले आहेत, आणि ते पण आपल्या छोट्या छोट्या कृतीतून, आणि कुठलीही आगाऊ मेहनत किंवा कुठलीही फीस न देता, सरळ आणि सोप्या technique मधून. 




पुस्तकात काय आहे. 

हे पुस्तक सर्वस्वी आपली विचाराच्या सामर्थ्याविषयी भाष्य करते,  विचारात किती ताकत आहे,  तो विचार तुम्ही कशा प्रकारे करता. त्यावर त्याची शक्ती आणि विधवंसकता ठरते, हे या पुस्तकात उदाहरण सहित सांगितले आहे. 

सकारत्मक विचार तुम्हाला किती फायदा मिळून देऊ शकतात आणि ते सुविचार आपण कशाप्रकारे अमलात अनु शकतो हे यात मांडलेले आहे. 

१.  आपले धेय्य कशे ठरवावे, आणि ते कशाप्रकारे साध्य करावे . 
२.  आपण हाती घेतलेल्या गोष्टीवर ( संकल्पावर. कामावर  ) कशा प्रकारे विश्वास ठेवावा. आणि ते पूर्ण करावे. 
३. आपले ध्यये गाठण्यासाठी ऊर्जा कशाप्रकारे निर्माण करावी. 
४. चिंता करण्याची सवय आणि जीवनातील ताणतणावांवर कसे नियंत्रण मिळवावे. 
५. कठीण परिस्थितीला  काबू कसे करावे. 
६. वैयक्तिक संबंध कशे सांभाळावे 


  वरील गोष्टी आपण या पुस्तकातून शिकू शकतो, आणि हजारो लोकांनी ज्या प्रकारे आपल्या  जीवनात परिवर्तन उघडून आणले आहे. आपण पण आपली आयुष्यात निश्चित एक आशावादी परिवर्तन घडू शकतो. 


पुस्तक कसे वाचावे. 

पुस्तके वाचायची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. त्यामुळे प्रतकानी आपल्या ला जमेल अशाप्रकारेच पुस्तक वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचताना एक छोटी डायरी आपण सोबत ठेवली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. 
या मध्ये छोटी छोटी अवतरणे आणि सुविचार आपण लिहून घेऊ शकतो. सोबतच प्रत्येक चॅप्टर मध्ये लेखकांनी  काही Techniques दिल्या आहेत ज्या आपल्याला अमलात आणायच्या आहेत. त्या आपण आपल्या डायरीत लिहू घेऊ शकतो. 
दररोज  त्याचा वापर करू शकतो.




लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.

 लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.     तणाव आणि चिंता मानवी जीवन ऊर्जा शोषून घेतात. अनेक आजाराच्या मुळाशी, आणि प्रगतीला रोखण्यास क...