Sunday 3 November 2019

ट्रेन टू पाकिस्तान



प्रसिद्ध  लेखक आणि पत्रकार जसवंत सिंग यांचे  ट्रेन टू  पाकिस्तान ह्या इंग्लिश पुस्तकाचे मराठी भाषांतर  काल वाचून संपवलं.  हि  छोटेखानी कादंबरी भारत - पाकिस्तान फाळणीच्या वेळी सीमेलगतच्या छोट्याश्या गावात  घडते.

मनोमानजरा  नावाचं सतलज नदीकाठी वसलेलं शिख- मुस्लिम लोक वस्ती असलेलं  एक छोटासा गाव,गावाच्या  लागत रेल्वे जंकशन आहे, सीमेलगतच शेवटचं  गाव आणि त्यामुळेच या गावाला थोडस महत्व आहे. 

गावात एकुलतं एक हिंदू सावकाराच  घर आहे. त्या सावकाराच्या घरी दरोडा पडतो आणि त्याचा खून होतो. गावातील एका दरोडेखोरांचा आणि एका मुस्लिम मुलीचं  एकमेकांवर प्रेम आहे,
देशाची फाळणी  झाली आहे, पाकिस्तान हा मुस्लिमांसाठी वेगळा देश अस्तित्वात आला आहे.

 एका दिवशी  सतलज नदीपलीकडील पाकिस्तानातून एक ट्रेन येते माणसांनी  खचाखच भरलेली; पण हि ट्रेन रोजच्या सारखी नाही. शांत असलेलं मनोमानजरा ढवळून निघत. 





लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.

 लाओ त्सु च्या तणाव मुक्तीच्या ४ क्लुप्त्या.     तणाव आणि चिंता मानवी जीवन ऊर्जा शोषून घेतात. अनेक आजाराच्या मुळाशी, आणि प्रगतीला रोखण्यास क...